Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बल्लारपूर पब्लिक स्कूल येथे एकल व समूह नृत्य स्पर्धा संपन्न

बल्लारपूर पब्लिक स्कूल येथे एकल व समूह नृत्य स्पर्धा संपन्न

मूल प्रतिनिधी


बल्लारपूर पब्लिक स्कूल मुल येथे एकल नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धा उत्साहात पार पडली. कार्यक्रमासाचे अध्यक्षस्थानी बल्लारपूर पब्लिक स्कूल चे प्राचार्य विनोद बोलीवार, मुख्य अतिथी राष्ट्रवादी काँग्रेस चे बल्लारपूर विधानसभा शेत्राचे अध्यक्ष सुमित समर्थ,  विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती मूल येथील शिक्षण विस्तार अधिकारी गुज्जनवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे, पत्रकार अमित राऊत मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. नृत्याचे परीक्षक म्हणुन वंशिका येनप्रेडिवार आणि विशाल नागुलवार हे होते.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका  हिना वाघाडे आणि शुभांगी मडावी यांनी केले तर 
कार्यक्रमाचे आभार रुहिना सय्यद यांनी मानले.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमामध्ये वेशभूषा स्पर्धा आणि टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राचार्य, शिक्षक,  शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् या राष्ट्रगान ने झाली

Post a Comment

0 Comments