Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा मुल कार्यकारिणी सभा संपन्न

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा मुल कार्यकारिणी सभा संपन्न

मूल प्रतिनिधी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा मुल जिल्हा चंद्रपूर कार्यकारिणीची सभेचे आयोजन दिनांक २२/९/२०२२ ला संध्या. ५.०० वा. वॉर्ड न. १६ बुद्ध विहार विहीरगाव मुल येथे मा. दिलीप गेडाम अध्यक्ष अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा मुल यांचे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करण्यात आले व अभिवादन करण्यात आले. 
सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा करून संमती देण्यात आली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सभासद संख्या वाढ करणे तसेच ग्रामीण भागात शाखा स्थापन करणे व त्याबाबत जागृती करणे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती गठीत झाल्या बाबतची माहिती संबंधित तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी, ठाणेदार, गटशिक्षण अधिकारी व मुख्याधिकारी यांना माहितीसाठी पत्रव्यवहार करणे. थोर महापुरुषांचे जयंती निमित्त शहरातील वर्डत व ग्रामीण भागात ग्रामस्वच्छता अभियान राबविणे. रक्तदान शिबिराचे आयोजन करणे व अंधश्रद्धा निर्मूलन समिती बाबत नागरिकांना कलापथक, एकांकिका, गीत गाऊन प्रभातफेरी काढून माहिती देणे.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या माध्यमातून समाजामध्ये बुवाबाजी करणारे ढोंगी बाबा यांचा विरोध करून त्यांचे ढोंगीपणा व फसवेगिरी समाजासमोर दाखवावे.

प्रत्येक कार्यकारिणी सदस्यांनी अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र २००/- दोनशे रुपये वर्गणी देऊन लावावे तसेच प्रत्येक सदस्यांनी १० वार्तापत्र लावण्याची कार्यवाही करावी तसेच दिवाळी वार्तापत्र विशेष अंकासाठी किंवा व्यापारी प्रतिष्ठित नागरिकांना बातमीसाठी रक्कम गोळा करावी. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात प्राथमिक शाळेत घेण्यात येणाऱ्या बुवाबाजी द्वारे समाजात गैरसमज करून पैसे लुबाडणाऱ्या  ढोंगी बाबा बाबत किंवा अंधश्रद्धा निर्मुलन समिती द्वारे सबंधित अधिकारी, मुख्याध्यापक यांना पत्र देऊन चर्चा करणे. आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
               

Post a Comment

0 Comments