Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कृषी महाविद्यालया तर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

कृषी महाविद्यालया तर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न 

मूल प्रतिनिधी

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय मुल तर्फे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअतर्गत कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन सावली येथे करण्यात आले. यावेळी मंचावर कृषी पर्यवेक्षक रमेश सेमस्कर, जेष्ठ नागरिक गोविंदा कटकेलवार, मुकेश तंबूवार,   चेतन गंजीवार, गणेश येनघंटे, माणिक रेगलवार, अनुराधा  विरगमवार, तारा टेकाम, प्रतिभा कारकडे यांची उपस्थिती होती.

सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी महाविद्यालय मुलचे प्राचार्य डॉ. विष्णुकांत टेकाळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमाकांत गजभिये,  कार्यक्रम अधिकारी डॉ. दिनेश नवलकर, कार्यक्रम सहकारी डॉ. विलास साखरकर, तसेच महाविद्यालयाचे सर्व विषय तज्ञ यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले.

सावली येथे शेतकऱ्यांना बियाण्याचे प्रकार व त्यांची शुद्धता या बद्दल माहिती देण्यात आली. यावेळी पूजा ढोबळे यांनी बियाण्यांचे प्रकार व महत्व तर निकिता चौधरी यांनी बियाण्यांचे अनुवांशिक शुद्धता याबाबत तर माहेश्वरी धुर्वे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, जनावरांच्या चाऱ्याचे  नियोजन, बियाण्यांची उपवन क्षमता तपासणे, सेंद्रिय शेतीचे महत्व आदी विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुची रामटेके तर आभार सुप्रिया लाकडे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील शेतकरी तसेच कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments