Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

झाडिबोली साहित्य मंडळ जिल्ह्यातील शिक्षकांना शब्दसाधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करणार

झाडिबोली साहित्य मंडळ जिल्ह्यातील शिक्षकांना शब्दसाधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करणार
------------------------------------- ---
१८ सप्टेंबर ला गोंडपीपरी येथे होणार पुरस्काराचे वितरण
----------------------------------------
१५ तालुक्यातील १५ साहित्यिक शिक्षकांचा समावेश
--------------------------------------

मूल प्रतिनिधी
 

             झाडीबोली साहित्य मंडळ झाडीपट्टीचे वैशिष्ट्ये साहित्यातून समोर आणण्यासाठी लिहित्या हातांना प्रोत्साहन देत असते . याचाच एक प्रेरक भाग म्हणून दरवर्षी साहित्याबरोबर सामाजिक ,सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यात अतुलनीय योगदान देणाऱ्या झाडीपट्टीतील साहित्यिक शिक्षकांना झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कारदेत असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी झाडीबोली साहित्य मंडळाच्या निवड समितीने झाडीबोली संवर्धन आणि चळवळीसाठी भरीव योगदान देणाऱ्या एका तालुक्यातून एक यानुसार १५तालुक्यातून१५ साहित्यिक शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे .
        झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार निवड समितीत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ,जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर , जिल्हा महिलाअध्यक्ष प्रा.रत्नमालाताई भोयर व जिल्हासदस्य लक्ष्मण खोब्रागडे यांनी मूल्यांकन व परिक्षणाचे काम केले .झाडीबोली वृद्धीच्या निकषानुसार निवड झालेल्या साहित्यिक शिक्षकांना १८सप्टेंबर २०२२ ला गोंडपीपरी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानवस्त्र , सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे . सदर कार्यक्रमास जिल्हाभरातून साहित्यिक मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हासरचिटणीस रामकृष्ण चनकापुरे यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments