Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शिक्षकांच्या समस्या सोडवायला प्रशासनाला भाग पाडू : आमदार किशोर जोरगेवार

शिक्षकांच्या समस्या सोडवायला प्रशासनाला भाग पाडू : आमदार किशोर जोरगेवार

निगरगट्ट प्रशासनाने राष्ट्रनिर्मात्या शिक्षकांचा सन्मान राखावा

प्रतिनिधी

दोन वर्षे कोरोनाच्या महामारीत उध्वस्त झाली .  शिक्षकांनी कर्तव्य बजावत शिक्षणात खंड पडू दिला नाही . विविध उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता राखल्याने महाराष्ट्राला शिक्षणक्षेत्रात गौरव प्राप्त झाला .परंतु गाजावाजा करणारे प्रशासन राबणाऱ्या शिक्षकांच्या समस्या सोडवायला कुचराई करून संघटनांच्या मागणीकडे जाणूनबुजून कानाडोळा करीत आहे . हे मी लोकप्रतिनिधी म्हणून खपवून घेणार नाही . शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला भाग पाडायला मी कटिबद्ध असल्याचे वक्तव्य आमदार किशोर जोरगेवार यांनी पुरोगामीच्या धरणे आंदोलनात केले . 
-----------------------------------
प्रशासकीय सहकार्य हाच पुरस्कार अनमोल ठरला असता

शिक्षकदिनी शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे , ही अभिमानाची गोष्ट आहे . पण शिक्षकांसमोर अनेक समस्या आ वासून उभ्या असताना अशा पुरस्कारांची बोळवण कोणत्या कामाची . शैक्षणिक वातावरण पोषक बनविण्यासाठी प्रशासनाने आपला निरुत्साह झटकून सहकार्य केल्यास खऱ्या अर्थाने शिक्षकदिन साजरा झाला  असता .   पण आज ५ सप्टेंबरला जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असताना मग्रूर प्रशासन जाणूनबुजून त्यांची कुचंबणा होईल अशा अनेक समस्या प्रलंबित ठेवून प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे .अशी मग्रुरी पुढे खपवून घेतली जाणार नाही .महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आलेली आहे . परंतु निगरगट्ट प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाने शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . त्याला वाचा फोडून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना ५ सप्टेंबर ला शिक्षकदिनी विविध मागण्या घेऊन जिल्हा परिषद चंद्रपूर समोर भर पावसात धरणे आंदोलन आयोजित करून प्रलंबित समस्यांना वाचा फोडली .
       उच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखाचे अनेक पदे रिक्त असून पदोन्नतीअभावी शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे  . एकस्तरबाबत न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून शुद्धीपत्रक निघाले नसल्याने शिक्षकांची आर्थिक कुचंबणा होत आहे . डीसीपीएस धारकांच्या कपातीचा अजूनही हिशोब मिळालेला नाही .वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणीचे प्रस्ताव धूळखात पडलेले आहेत . सर्व्हिसबुक पळताळणी वेळेवर होत नसून दप्तरदिरंगाई केल्या जात आहे .विषयशिक्षकांना वेतनश्रेणी दिल्या गेली नाही , अशा विविध समस्या आ वासून असल्याने शिक्षकदिनी शिक्षकांना  धरणे आंदोलन करावे लागले . सुरुवातीला उकाडा असताना निसर्गाने जलधारा बरसून सहकार्य केले , पण प्रशासनाची नियमाला बगल देणारी वृत्ती कधी सरळ होईल ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे . याकडे प्रशासन लक्ष देईल की आपले तकलादू धोरण रेटत नेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी लाक्षणिक धरणे आंदोलनाला भेट देऊन समस्या निघाली काढण्याचे आश्वासन आपल्या भाषणातून विशद केले. मान.वर्षाताई गौरकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना आंदोलन संपन्न झाल्याचे मागण्यांचे निवेदन देऊन विविध १८ समस्यांवर चर्चा करण्यात आली. समस्या निकाली न निघाल्यास संघटनेचे वतीने साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे .

Post a Comment

0 Comments