Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

माउंट कॉन्व्हेंट मूल येथे हिंदी दिवस संपन्न

माउंट कॉन्व्हेंट मूल येथे हिंदी दिवस संपन्न

मूल प्रतिनिधी

माउंट कॉन्व्हेंट आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, मुल येथे 14 सप्टेंबर 2022 रोजी हिंदी दिवस साजरा केला. या दिवशी चुटकुले, दोहा वाचन आणि शेरो शायरी यासारख्या विविध स्पर्धा फक्त हिंदी भाषेत घेण्यात आल्या. या महत्त्वाच्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक श्री रवि कावळे सर यांनी लेट फ्लाय अॅक्टिव्हिटीचे विद्यार्थी, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त विद्यार्थी इत्यादींचे अभिनंदन केले.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना हिंदीची जाणीव करून दिली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.रवी कावळे सर, अकॅडमीक इंचार्ज श्री.अस्पाक सय्यद सर, हिंदी विभाग श्री.सचिन सर, सौ.ज्योत्सना मॅम, सौ. श्वेता मॅम व इतर शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन श्री सचिन सर यांनी केले, कार्यक्रमाचे रूपरेषा श्वेता मॅम यांनी सादर केली तर समारोप ज्योत्सना मॅम यांनी केला.

Post a Comment

0 Comments