Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक आमसभा संपन्न

विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक आमसभा संपन्न

मूल प्रतिनिधी

विविध कार्यकारी सहकारी संस्थेची वार्षिक आमसभा संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संदीप कारमवार उपस्थित होते. उपाध्यक्ष अरविंद बोरुले, संचालक विवेक मुत्यलवार, रवी कामडी, भोजराज गोवर्धन, मनोज मुत्यलवार,चंदा कामडी, सुधाकर कटकमवार संचालक आणि संस्थेचे सभासद शेतकरी उपस्थित होते.

व्यवस्थापक संजय बद्देलवार यांनी संस्थेचा लेखाजोगा मांडला. तर सभा अध्यक्ष संदीप कारमवार यांनी 65 वर्षापासून सुरू असलेली ही संस्था 27 गावात व दोन तालुक्यात या संस्थेचे कार्यक्षेत्र असल्यामुळे लाखो रुपये कर्ज वाटप करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याचे काम करीत असल्याचे सांगितले.

सभासद शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज नियमित कर्जफेड करून संस्थेला सहकार्य करावे व संस्थेच्या उत्पन्न वाढीस मदत करावी असे आवाहन करण्यात आले. पुढील काळात संस्थेची नवीन सुसज्ज इमारत, दुकान गाडे उभारायचे असून संतोषसिंह रावत यांच्या सहकार्याने आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून पूर्ण होईल असे मत व्यक्त केले. उपस्थित सर्व शेतकरी सभासदांचे आभार मानून सभा समाप्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments