Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

KFCM चे 7 खेळाडू करतील महाराष्ट्र कराटे असोसिएशन च्या 43 व्या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे चे नेतृत्व

मूल प्रतिनिधी

महाराष्ट्र ऑलिम्पिक कमिटीशी संलग्नित असलेल्या महाराष्ट्र कराटे अससोसिएशनची 43 वी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा-2022, ही  27 आणि 28 ऑगस्ट रोजी पुणे येथील बालेवाडी स्पोर्ट्स स्टेडियम मध्ये होणार आहे. सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या टीम मध्ये कराटे & फिटनेस क्लब मूलच्या 7 खेळाडूंचा समावेश असणार आहे. ह्या निवडीसाठी दिनांक 14 ऑगस्ट ला बल्लारपूर येथे MKA च्या चंद्रपूर जिल्हा युनिट कडून निवड स्पर्धा घेण्यात आली होती त्यात मूल च्या 12 खेळाडूंची निवड चंद्रपूर टीम मध्ये झाली होती त्या पैकी 7 खेळाडू आता आपल्या वय आणि वजन गटात चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करतील. निवड होऊन स्पर्धेला जाणाऱ्या खेळाडूमध्ये श्रीजा सहारे ही 11 वर्षाखालील मुलींमध्ये काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये आणि यशस्वी येनुगवार ही कुमिते प्रकार मध्ये सहभागी असेल तर 14 वर्षाखालील मुलींमध्ये दिव्या नरड आणि विधी कोटकोंडावार ह्या कुमिते प्रकार मध्ये, 18 वर्षाच्या वरील मुलींमध्ये साक्षी गुरनुले ही काता प्रकारात तर क्लब चे प्रशिक्षक इम्रान खान आणि निलेश गेडाम हे दोघेही ग्रुप कुमिते या प्रकारात सहभागी असणार आहेत.
पुणेच्या स्पर्धेसाठी वरील KFCM ची टीम दिनांक 26 ऑगस्ट ला मूल वरून रवाना होईल. संपूर्ण टीम ला प्रशिक्षक-पालकांनी तसेच शहरवासीयांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. सहभागी खेळाडूंनीही प्रशिक्षण,आत्मविश्वास आणि मार्गदर्शनासाठी तसेच त्यांच्या यशासाठी प्रशिक्षक ,पालक आणि सेन्सेई विनय बोढे सर यांना श्रेय दिले आहे.

Post a Comment

0 Comments