Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

आयुष्यातला फावला वेळ सत्कार्यात लावा - अभिजीत चेपूरवार, हनुमान मंदीर परीसरात राबविली स्वच्छ्ता मोहिम

आयुष्यातला फावला वेळ सत्कार्यात लावा - अभिजीत चेपूरवार, हनुमान मंदीर परीसरात राबविली स्वच्छ्ता मोहिम

मूल प्रतिनिधी

मूल बस स्थानकावर हनुमानाचे मंदिरा समोर वडाचे झाड आहे. वडाचे झाडालगत बनविलेला चबुतऱ्यावर आणि सभोवतालच्या परिसरात अस्वच्छता तयार झाली होती. आज रविवार असून सुट्टीचा दिवस असल्याने फावल्या वेळाची संधी साधून मूल येथील श्रीसाई मित्र परिवाराचे अध्यक्ष अभिजीत चेपूरवार, कार्यकर्ते नितीन अलगुनवार, प्रफुल बाबा आर्ट आदि कार्यकर्त्यांनी स्वच्छ्ता केली.

मुल बस स्थानकावरील हनुमान मंदिरात मोठ्या संख्येने भक्त येत असतात. काही वेळ मंदिर परिसरात शांत भावनेने घालवीत असतात. त्याला लागूनच एक वडाचे पवित्र झाड आहे.

वडाचे झाड एका तासाला साधारणपणे सातशेबारा किलो ह्या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडत असते. भरपूर पाने असल्यामुळे विषारी वायू शोषला जाऊन हवा शुद्ध ठेवण्याचे काम वडाचे झाड करते. वड उन्हाळ्यात दिवसाला २ टन इतके पाणी, बाष्प स्वरूपात वातावरणात सोडत असतात. अनेक महत्व या झाडांचे असल्याची माहिती अभिजीत चेपूरवार यांनी सांगितली.

सोबतच फावल्या वेळेची संधी माणसाने सत्कार्यात लावली पाहिजे असेही त्यांनी मूल Live शी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments