Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जयपाल सिंह' 'हॉकीचा कर्णधार ते संविधान सभा' पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न

जयपाल सिंह' 'हॉकीचा कर्णधार ते संविधान सभा' पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न 

मूल प्रतिनिधी

सरकारचे खाजगीकरण धोरण बघता आदिवासी समाजाने ओबीसी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून चळवळी उभ्या करणे काळाची गरज आहे मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय हे आपले बांधवच आहेत असे मत हिरालाल येरमे यांनी व्यक्त केले.
 ते जागतिक आदिवासी दिनानिमित्त गुलगुलान साहित्य व संस्कृती मंच मूल च्या वतीने येतील कन्नमवार सांस्कृतिक सभागृहात आयोजित 'जयपाल सिंह' 'हॉकीचा कर्णधार ते संविधान सभा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना मांडले. पुढे बोलताना ग्रंथालयाचे उपयोग समाजाने केला तरच साहित्य आणि त्यातील समाज उपयोगी गोष्टी घराघरात पोहोचतील इंटरनेटमध्ये गुरुपडून राहण्यापेक्षा पुस्तकाचे वाचन आयुष्यातील महत्त्वाच्या प्रगत वाटा शोधण्याकरिता मार्गदर्शक ठरतील असे विचार त्यांनी प्रगट केले. यावेळी प्रकाशन सोहळ्याचे प्रकाशक डॉक्टर राकेश गावतुरे यांनी आदिवासी समाज हा भोळा भाबडा आहे अत्यंत प्रामाणिकता समाजामध्ये अजूनही दृढ आहे. परंपरेनुसार अजूनही हा समाज वाटचाल करतो आहे ,यापुढे जाऊनआदिवासी ने साहित्य कडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल केल्यास समाज प्रगत होण्यास मदत होईल असे विचार प्रगट केले. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून उलगुलान साहित्य व संस्कृती मंच मूल द्वारा आयोजित हा प्रकाशन सोहळा  हिरालाल येरमे सामाजिक विचारवंत आरमोरी, यांच्या अध्यक्षतेखाली तर  डॉक्टर राकेश गावतुरे सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले .यावेळेस विचारपिठावर प्रभू राजगडकर.  ज्येष्ठ साहित्यिक तथा से.नी.आधिकरी, धनंजय साळवे कवि तथा  लेखक चंद्रपूर , राजेश मडावी समीक्षक तथा लेखक, रवी वाघाडे ,सामाजिक कार्यकर्ते चंद्रपूर , नरेश बोरीकर कवी चंद्रपूर, प्राध्यापक विजय लोणबले सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हाध्यक्ष समता परिषद महाराष्ट्र राज्य, डॉक्टर समीर कदम , अशोक येरमे अध्यक्ष मूल तालुका पत्रकार संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सुनील संगेल , चिदानंद सिडाम यांनी संगीतबद्ध केलेल्या सुमधुर स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. आदिवासी संस्कृतीची जपणूक म्हणून एक गोंडी नृत्य सादर करण्यात आले. उपस्थित सर्व पाहुण्यांनी प्रकाशन सोहळ्या  संबंधी  प्रब्रम्हानंद मडावी यांनी भविष्यात वेगवेगळे साहित्य प्रकाशित करून  साजसेवी कार्य करावे अशा शुभेच्छा सर्वांनी दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन प्रवीण सुरपाम, तर पाहुण्याचे व उपस्थितांचे आभार दीपक कुळमेथे यांनी मानले. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाज बांधव,भगिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments