Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वंचित बहुजन आघाडीची मूल शहर कार्यकारणी गठीत, अध्यक्षपदी डेव्हिड खोब्रागडे यांची निवड

वंचित बहुजन आघाडीची मूल शहर कार्यकारणी गठीत, अध्यक्षपदी डेव्हिड खोब्रागडे यांची निवड

मूल प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडी मूल शहराची कार्यकारणी गठीत करण्यात आली. यावेळी मूल शहर अध्यक्षपदी डेव्हिड खोब्रागडे यांची निवड करण्यात आली.

यामध्ये मुल शहर महासचिव दिलीप गेडाम, उपाध्यक्ष मुरलीधर घोनमोडे, संघटक यशवंत देवगडे, पद्माकर नारनवरे, सल्लागार रमेश मानकर, सचिव विशाल रामटेके, सहसचिव अजित दुर्गे, कोषाध्यक्ष मनोहर दुर्गे आदींची निवड सर्वानुमते करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष भूषण फुसे, जिल्हा निरीक्षक बंडू नगराळे, जिल्हा प्रभारी राजेंद्र बोरकर, तालुका निरीक्षक डॉ. प्रवीण गावतुरे यांच्या उपस्थितीत सर्वांची  निवड करण्यात आली.

येणाऱ्या निवडनुकाबाबत तसेच कार्यकर्ता मेळावा बैठकीत ही निवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments