Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल मध्ये वाजला एकाच दिवशी काँग्रेस बीजेपी चा बँड

मूल मध्ये वाजला एकाच दिवशी काँग्रेस बीजेपी चा बँड

मूल प्रतिनिधी

आज मूल शहरात एकाच दिवशी काँग्रेस आणि भाजपाचा कार्यक्रम असल्याने शहरातील गांधी चौकात कार्यक्रमाच्या निमित्याने फटाके फोडून बँड वाजवत जल्लोश साजरा करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीचे ज्‍येष्‍ठ नेते, राज्‍याचे माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदी शपथविधी घेतल्याने स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून बँड वाजवत आनंद साजरा केला तर सायंकाळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आजादी गौरव यात्रा मूल येथे दाखल होताच शहरातील स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून बँड वाजवत यात्रेचे स्वागत केले.

आज शहरात दोन्ही पक्षांनी बँड वाजवत जल्लोष साजरा केल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यातही उत्साह दिसून येत होता.

Post a Comment

0 Comments