Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वाढदिवसानिमित्त बंडू साखलवार यांचा सामाजिक उपक्रम




शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वाढदिवसानिमित्त बंडू साखलवार यांचा सामाजिक उपक्रम

मूल प्रतिनिधी

मुल तालुक्यातील जाणाळा येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते श्री साई बोरवेल चे संचालक, श्री साई मित्रपरिवार चे सदस्य यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मूल तालुक्यातील जाणाळा ,आघडी, केळझर आदी गावातील जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा येथील शालेय विद्यार्थ्यांना बुक , पेन आणि खाऊ चे वाटप करून वाढदिवस साजरा केला. शाळेच्या मुख्याध्यापिका विद्यार्थी यांनी साखलवार यांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

माझ्या मूळ गावी, ज्या जिल्हा परिषद शाळेत आणि आश्रम शाळेत शिक्षण घेतले, गावात लहानपण रमले त्या गावाला माझं काहीतरी देणं लागतं या उदात्त हेतूने शालेय बालकांसोबत जन्मदिवस साजरा करीत असल्याचा आनंद असून जानाळा गावावर माझे प्रेम आहे, गावासाठी सदैव झटत राहील, गावासाठी मदत लागल्यास फुल ना फुलाची पाकळी याप्रमाणे मदत करणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सोबतच जाणाळा येथील आश्रम शाळेतही त्यांनी बुक पेनचे वाटप केले. आश्रम शाळेत आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमाचे उद्घाटन बंडू साखलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अनिल बुटे, शिक्षवृंद , श्री साई मित्र परिवार चे विवेक मुत्यलवार, नाना किर्तीवार,सोमेश्वर रेड्डीवार, रितिक पोगुलवार, जाणाळा येथिल युवक, ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments