Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वढोलीत पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांचे स्वागत व पुरस्कार प्रदान, लोकसहभागातून संस्कृतीचे प्रदर्शन

वढोलीत पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांचे स्वागत व  पुरस्कार प्रदान, लोकसहभागातून संस्कृतीचे प्रदर्शन

मूल प्रतिनिधी

            भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकरी मुख्य कणा आहे . त्या शेतकऱ्यांच्या बैलाचा सन्मान वाढविणारा सण पोळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . आपल्या वेगळ्या वैशिष्ट्याने या सणाला रंगत आणणाऱ्या गोंडपीपरी तालुक्यातील वढोली या गावात शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ बैल पोळा उत्सव लकी ड्रा च्या माध्यमातून विविध शेतीउपयोगी साहित्य बक्षीस दिल्या जाते . 
             दरवर्षीप्रमाणे यावर्षी सांस्कृतिक नगरी म्हणून नावलौकिक असलेल्या वढोली  गावाने एकोपा दाखवीत सांघिक भावनेने पोळा सण मोठ्या उत्साहात पार पाडला . गेल्या  वर्षांच्या परंपरेला बैल पोळा उत्सव समिती वढोलीने विविध कार्यक्रमातून उजळणी दिली . याकरिता सर्व ग्रामस्थांकडून देणगी रूपाने आर्थिक मदत घेऊन लकी ड्रा सारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
    पोळ्याच्या दिवशी सर्व बैलजोडी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचे कुंकूमतिलक लावून स्वागत करण्यात आले . सर्वांना मानवस्त्र म्हणून दुपटा देण्यात आला . सर्वांची नावनोंदणी करून एकत्रित चिठ्यातून निघालेल्या१५ भाग्यशाली शेतकऱ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले . त्यानंतर झडत्या बोलण्याची स्पर्धा चुरस वाढवणारी ठरली . हर बोला हर हर महादेवच्या गजरात तोरण तोडण्याची मजा आणि बैलाची प्रभातफेरी उपस्थितांच्या उत्साहात भर घालत होती . यासाठी गावातील सर्व नागरिक व तरुणांनी सहकार्य केल्याचे वढोली येथील रहिवासी सुनील कोहपरे यांनी कळविले .

Post a Comment

0 Comments