Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

एड.राजेंद्र महाडोळे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी संपन्न,कार्यक्रमात राकेश मोहूरले यांचा सत्कार

एड.राजेंद्र महाडोळे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी संपन्न,कार्यक्रमात राकेश मोहूरले यांचा सत्कार

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील अखिल भारतीय माळी महासंघ, क्रांति ज्योती सेवा संघ मूल ओबीसी संघटना, समता परिषद,बहूजन विचार वादी तसेच अन्य सामाजिक संघटनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व ओ.बी.सी.क्रांति दलाचे प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अॅड राजेंद्र महाडोळे यांचा वाढदिवस मूल येथे  साजरा करण्यात आला.
या प्रसंगी  सत्कार मूर्ती, अॅड .राजेंद्र महाडोळे, युवा सामाजिक कार्यकर्ता मूल राकेश मोहूर्ले तर अध्यक्ष स्थानी मूल बाजार समितीचे तथा क्रांति ज्योती नागरी सहकारी पत संस्थेचे संचालक डाॅ.पदमाकर लेनगुरे ओ.बि.सी.क्रांति दल विदर्भ संघटक प्रविण पेटकर अमरावती, ओबीसी कांग्रेस सेल प्रदेश सरचिटणीस तथा अखिल भारतीय माळी महासंघ चंद्रपुर ,गुरूदास चौधरी फिसकूटी येथील हायस्कूल संस्थापक अध्यक्ष, तथा अखिल भारतीय माळी महासंघ चंद्रपुर उपाध्यक्ष  अध्यक्ष वासुदेव गुरूनुले ,विठ्ठलराव नाकतोडे ओ बी सी जिल्हा संघटक यवतमाळ, राजेंद्र मांदाळे जिल्ह  संघटक अखिल भा.माळी महासंघ ,अमोल गुरूनुले अध्यक्ष अखिल भा.माळी महासंघ यवतमाळ इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
पाहूण्यांचे स्वागिता नंतर केक कापून अॅड. राजेंद्र महाडोळे  यांचा जन्म दिवस साजरा तर राकेश मोहूरले मूल यांचा संयुक्त वाढदिवस साजरा करून  मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या, अॅड. राजेंद्र महाडोळे यांच्या सामाजिक चळवळीतील  कार्याचा बदल शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
अॅड . राजेंद्र महाडोळे यांचे हस्ते, युवा सामाजिक कार्यकर्ता  राकेश मोहूरले यांचा सत्कार आयोजकांचे वतीने करण्यात आला.
वासुदेव गुरूनुले यांनी देशातील आजची राजकीय परिस्थिती आणि सामाजिक संघटनाच महत्व विशद केले. गुरूदास चौधरी यांनी अॅड राजेंद्र महाडोळे याचे जीवन कार्याचा प्रवासावर प्रकाश टाकत अगदी उमदया वयात सामाजिक कार्याला वाहून घेत चळवळीचे करीत आहेत त्यांचे  कार्य हे उल्लेखनीय असून अॅड राजेंद्र महाडोळे हे त्याग करीत आहेत व संघर्षाच जीवन जगत आहेत, सामाजिक व त्याच्या ओबीसी संघर्षात सर्व  सामाजिक संघटनांनी  सहभागी होउन सहकार्य करावे असे आव्हान  केले तर युवा कार्यकर्ता राकेश मोहूरले यांनी, आपन झेंडे आणि बॅनर लावता,,लावता कार्यकर्ते कधी, बनतो,,? हे न कळत घडते, ही सामाजिक कार्याची प्रेरणा मी अॅड. राजेंद्र महाडोळे साहेब यांचे कडून घेतली अस,आपलं मनोगत व्यक्त केले.
अॅड. राजेंद्र महाडोळे यांनी आयोजकांचे आभार मानले व ओ बी सी चळवळीचे महत्व पटवून देत,युवकांनी, सामाजिक चळवळीत भाग घेवून समाज व देश घडवण्यासाठी हातभार लावला पाहिजे असं मत व्यक्त करीत  ओबीसी समाजानी,बहूजन समाजानी आता पेटून उठण्याची हाक दिली, ते आपल्या भाषणातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगत  गुलामाना, गुलामीची जाणीव करून देण्याची गरज आहे असे सांगत सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारावा असं सांगितलं 
कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. पदमाकर लेनगुरे यांनी  जो चांगल काम करतो, समाज त्याचे पाठी मागे उभा होता त्याचा सत्कार करतो तो कुठला आहे कोण आहे हे बघत नाही, समाज कार्य बघतो असे परखड मत व्यक्त करीत ओबीसी समाजाची दशा व्यक् केली जाती भेदभाव न करता फक्त ओबीसी म्हणून लढण्याच आव्हान केलं 
या प्रसंगी उपस्थित  संजय वागुळे,प्रसिद्धी प्रमुख  ओबीसी क्रांती दल, मधूर जाधव युवा कार्यकर्ता  अमरावती ,सिंदेवाही तालुक्यातील, सामाजिक कार्यकर्ते अनिल महाडोळे, वसाके सर, मूल तालुक्यातील,श्रीरंग नोगोसे सर ,सूनिल मोहूरले सर, अरविंद जेंगठे सर,प्रदिप वाढई, कृषी केंद्र मूल   ,क्रांति ज्योती नागरी सहकारी पत संस्था मूल चे व्यवस्थापक रामदास गुरूनुले, सामाजिक कार्यकर्ते दुशांत महाडोळे, नंदू  बारस्कर ,  सौ, उषा शेंडे, आशिष लोनबले ,प्रणय निकूरे, अतुल लेनगुरे,  वनराज पेळूकर,  अखिल भारतीय माळी महासंघ ,समता परिषद,क्रांती ज्योत सेवा संघ,बहूजन चळवळीचे शेकडो कार्यकर्ते  आणि युवक ,धो धो पावसात  ही उपस्थित झाले, 
तत्पूर्वी, अॅड. राजेंद्र महाडोळे यांचे जन्म दिना निमित्त, कार्यकर्त्यांनी ,उप जिल्हा रुग्णालय मूल येथे रूग्णांना फळे वाटप केले व आदिवासी वसतिगृहात लगत वृक्ष रोपन केले या प्रसंगी, विरई येथील विद्यमान सरपंच प्रदिप वाढई, टोलेवाही येथील माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते संजय आवळे, क्रांति ज्योत सेवा संघ मूल संस्थापक,अध्यक्ष    ओबीसी विभाग ग्रामीण मूल तालुका अध्यक्ष राजेंद्र वाढई कांतापेठ  ईश्वर लोनबले इत्यादी कार्यकर्तेनी साजरा केला 
या कार्यक्रमाचे संचालन, ईश्वर लोनबले सर यांनी केले तर आभार युवा कार्यकर्ता ओमदेव मोहूरले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments