Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सुधीरभाऊ म्हणजे 'परिस'...! खाते वाटपाच्या निमित्याने..! - चंद्रकांत आष्टनकर

सुधीरभाऊ म्हणजे  'परिस'...!
खाते वाटपाच्या निमित्याने..! -  चंद्रकांत आष्टनकर

मूल

नुकतेच राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झाले आणि संपूर्ण  महाराष्ट्रात प्रसार माध्यमातून विशेषत: समाज माध्यमातून एकच चर्चा रंगू लागली ती म्हणजे विदर्भाची मुलूख मैदान तोफ, भाजपाचे जेष्ठ लोकनेते राज्याचे नवनिर्वाचित वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आदरणीय,सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना मिळालेल्या खात्यांची..!     सुधीरभाऊंची जेष्ठता,विद्वत्ता,अनुभव व त्यांचे कर्तुत्व पाहता त्यांना मिळालेल्या खात्यांचा उल्लेख हा महाराष्ट्राच्या पारंपारिक राजकीय भाषेत 'कमी दर्जाचे' किंवा 'बिनमलाइचे' खाते असाच केला जातो म्हणुन..चर्चा तर होणारच..!

मागील मंत्रिमंडळात भाऊंकडे हेच कमी दर्जाचे वनमंत्रालय होते, भाऊंनी आपल्या कर्तृत्वाच्या उंचीने याच खात्याला साता समुद्रापलीकडे 'प्रतिष्ठा' मिळवून दिली होती हे सुद्धा या महाराष्ट्राने बघितलं आहे.आणी आज हेच अडगळीत पडलेलं वन मंत्रालय प्रतिष्ठित खात्याचा यादीत आलं याचे संपूर्ण श्रेय भाऊंनाच जातं.

काही व्यक्तिमत्त्व आपल्या कर्तुत्ववाने इतके श्रेष्ठ व प्रतिष्ठित असतात की, त्यांच्या जवळ कितीही लहान व कमी दर्जाची खाती मुद्दामच देण्याचा प्रयत्न जरी झाला असला तरी 'परि साचा स्पर्श होताच ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते तसेच कितीही कमी दर्जाचे मंत्रालय असो,भाऊंकडे येताच त्याला 'श्रेष्ठत्व' येऊन 'प्रतिष्ठा' मिळते. 

या उलट एखाद्या कर्तव्यशून्य व्यक्तिमत्त्वाकडे कितीही महत्त्वाचे  खाते दिले तरी त्या खात्याची प्रतिष्ठा धुळीस मिळल्याशिवाय राहत नाही हे सुद्धा तितकेच सत्य आहे. म्हणुन आदरणीय भाऊंच्या शब्दात म्हणायचे झाल्यास 'कोणतेही खाते 'लहान-मोठे' नसते तर ते कोणाकडे दिले आहे व तो त्याला आपल्या कर्तृत्वाने कसं न्याय देतो त्यावर ते अवलंबून असते. ज्यावेळेस खात्यांबाबत 'मलाईदार' अश्या शब्दांचा वापर केल्या जातो याचा अर्थ असा की, तो खाता जास्तीत जास्त 'मेवा' मिळवून देणारा आहे हे अधोरेखित होते. आणि आदरणीय सुधीरभाऊंना स्वतः ला 'मेवा मिळवून देणारी खाते  नाही तर लोकांची 'सेवा' घडवून आणणारी खाती हवी असतात...! 
 पुन्हा एकदा अशीच जनसेवेची संधी मिळवून देणारे मंत्रालय भाऊंना मिळाले आहे. निश्चितच ते याही संधीचे सोनं करून या मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दिन-दलित, अनाथ-अपंग,शोषित-पिडीत, गोर-गरीब जनतेच्या कल्याणासाठी सदैव झटून त्यांना न्याय देतील..यात शंका नाही..!                         

आज तर आदरणीय भाऊंनी इतिहासाच रचला खाते वाटपाची घोषणा होताच एका क्षणाचाही विलंब न लावता आपल्या कार्यशैलीची प्रचिती देत भर सभेत आपल्या संस्कृतीक कार्य विभागाचा निर्णय घेत यानंतर 'सर्व शासकीय कार्यालयात फोन वर 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम' नी  संभाषणाची सुरुवात करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि इतिहास रचला. 

म्हणुन विरोधकानी भाऊंना 'कमी दर्जाचे' खाते मिळाले म्हणुन आनंद व्यक्त करून स्वतःच्या राजकीय भविष्याचे दुःख विकत घेऊ नये. 
भाऊंच्या सच्च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मात्र कोणत्याही प्रकारे निराश न होता 'आनंद' व्यक्त केल्या शिवाय राहू नये. 

( शब्दांकन- चंद्रकांत आष्टनकर)
 सरचिटणीस,भाजपा मूल 

Post a Comment

0 Comments