Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

रानडुकराने केले एका इसमाला जखमी,भवराळा येथिल घटना

रानडुकराने केले एका इसमाला जखमी,भवराळा येथिल घटना 

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील भवराळा येथे एका इसमावर रानडुकराने हल्ला करून जखमी केल्याची घटना आज सकाळी 6 वाजताचे दरम्यान घडली.  ओमाजी घोडमारे वय 45 असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. जखमीवर मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार होत आहे.

ओमाजी आपल्या घराचे अंगणात काम करीत असताना अचानक जंगलातून रानडुक्कर घराचे अंगणात येऊन हल्ला केल्याने ही घटना घडली. जंगलातील जनावरे आता गावातील घरापर्यंत येत असल्याने गावात जंगली प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. यावर आळा घालावा, बंदोबस्त करावा अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments