Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बेवारस कादंबरीचे प्रकाशन तथा निमंत्रितांचे कवी संमेलन, ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर यांचे लाभणार मार्गदर्शन

बेवारस कादंबरीचे प्रकाशन तथा निमंत्रितांचे कवी संमेलन, ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर यांचे लाभणार मार्गदर्शन

पोंभुर्णा तालुक्यातील चेक कोसंबी येथील रहिवासी असलेले आणि सध्या ब्रम्हपुरी येथे सहाय्यक प्रकल्प अधिकारी या पदावर कार्यरत असलेले नवोदीत लेखक धनंजय पोटे यांच्या स्वलिखित "बेवारस" या कादंबरीचे प्रकाशन पंचायत समिती सभागृह पोंभुर्णा येथे मंगळवार दि.१६ आगस्ट २०२२ ला आयोजित केलेले आहे. सोबतच निमंत्रितांचे कवी संम्मेलन संपन्न होणार आहे.
      झाडीबोली साहित्य मंडळ,चंद्रपूर द्वारा आयोजीत या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्रातील नामवंत जेष्ठ साहित्यिक तथा चित्रपट निर्माते प्रा.ज्ञानेश वाकुडकर नागपूर आहेत.तर अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंढोपंत बोढेकर,केंद्रीय सदस्य झाडीबोली साहित्य मंडळ साकोली असणार आहेत. सदर कार्यक्रमाला प्रमुख भाष्यकार म्हणून कवी अरुण झगडकर अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य रत्नमाला भोयर अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर (महिला), सुनिल शेरकी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, कवी गंगाधर कुनघाडकर ज्येष्ठ साहित्यिक मूल, बाबुराव मडावी शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रपूर आहेत.
प्रकाशन निमित्ताने आयोजित निमंत्रितांचे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.संम्मेलनाचे अध्यक्षस्थानी उद्धव नारनवरे ज्येष्ठ साहित्यिक, गोंडपिपरी, आनंदराव बावणे जेष्ठ कथाकार पोंभूर्णा, कवी रामकृष्ण चनकापुरे, सरचिटणीस झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बहारदार कवी संमेलन संपन्न होणार तरी तालुक्यातील साहित्य क्षेत्रातील निगडित व्यक्तीने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक मंडळींनी केले आहे.

Post a Comment

0 Comments