Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जिल्हा परिषदेच्या विद्यार्थिनींनी तयार केल्या राख्या, स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव

जिल्हा परिषदेच्या विद्यार्थिनींनी तयार केल्या राख्या, स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव 

मूल प्रतिनिधी

स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सववाचे औचित्य साधून आणि उद्या रक्षाबंधनाचा सन असल्याने मूल तालुक्यातील जुनासूर्ला येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनीनी राख्या तयार केल्या.

रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहिण भावाच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे. संपूर्ण देशात हा सन मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरा करीत असतात. या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून संरक्षणाचा धागा बांधित असतात. यावेळी भाऊ सुद्धा बहिणीच्या संरक्षणाची शपथ घेत असते. जिल्हा परिषदेच्या विद्यार्थिनींनी राख्या तयार केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

जुनासुर्ला येथील सरपंच रणजीत समर्थ यांनी शाळेतील त्या सर्व विद्यार्थिनींचे आणि शिक्षकवृंदांचे केलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक करत भरभरून शुभेच्छा दिल्या आहे.

Post a Comment

0 Comments