Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

खालवसपेठ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, सामाजिक कार्यकर्ते सौरभ वाढई यांचा स्तुत्य उपक्रम

खालवसपेठ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, सामाजिक कार्यकर्ते सौरभ वाढई यांचा स्तुत्य उपक्रम 

मूल प्रतिनिधी

स्वातंत्र्य दिन निमित्त  सामाजिक युवा कार्यकर्ते, सौरभ वाढई यांच्या कुटुंबाला कडून दरवर्षीप्रमाणे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खालपसपेठ येथील 125 विद्यार्थ्यांना  शैक्षणिक साहित्य बुक पेन खाऊ व चॉकलेटचे  वाटप करण्यात आले.ग्रामीण भागात कित्येक विद्यार्थी आर्थिक परिस्थिति मुळे बुक पेन विकत घेऊ शकत नाही, त्या मुळे गोर गरीब विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहु नये व विद्यार्थ्यां ना अभ्यासाची सवय लागावी म्हणून सामाजिक युवा कार्यकर्ते  सौरभ वाढई यांच्या नेतृत्वात बुक व पेन वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
खालवास पेठ गावासोबत मा. हसन वाढई कुटूंबाची एक नाळ जोडलेली आहे. आपण या गावात वास्तव्याला होतो आणि आपलं काही सामाजिक देणे लागतो या उद्देशातून त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप , सोबतच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची कामना केली.

 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त आपले मनोगत व्यक्त करताना  सामाजिक युवा कार्यकर्ते सौरभ वाढई  यांनी म्हटले आज सर्वप्रथम आपण त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना सलाम केला पाहिजे, ज्यांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. हा दिवस आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपत राय, रामप्रसाद बिस्मिल यांच्यासह शेकडो महान स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देतो. या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी राष्ट्र उभारणी, राष्ट्र विकास आणि देशाच्या संरक्षणाची प्रतिज्ञा करूया आणि महात्मा गांधी यांचे सत्य आणि अहिंसेचे तत्व आपण आपल्या जीवनात अंमलात आणण्याचा संकल्प करूया. भारतीय संविधानाचा आदर करूया कारण यातच आपल्या देशाची शान आहे असे सौरभ वाढई यांनी विद्यार्थ्यांना संबोधले.
सौरभ वाढई यांनी विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्या प्रति सामाजिक दायित्व जोपासून शालेय विद्यार्थ्यांना  बुक ,पेन,आणि बिस्कीट चे वाटप केले.शालेय विद्यार्थ्याप्रति राबविलेल्या उपक्रमांनी शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले असल्याचे चित्र दिसून आले.सामाजिक युवा कार्यकर्ता सौरभ वाढईच्या उपक्रमानी सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच दिपक वाढई यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेतील महाडणे सर यांनी केले कार्यक्रमाला मुख्याध्यापक गाडेकर सर, पी एन चौधरी  साहेब, दिलीप वाळके, बोधन शेडमाके, शंकर शेंडे,  उपसरपंच राकेश निमगडे,  सदस्य उषा शेंडे , विनोद शेडमाके, नरेश वाढई, पिलेश्वर भलवे, जयंत कस्तूरे, सुधीर वाडगुरे, वैष्णव पोडचलवार, पिंटू चिमुलवार, अक्षय दुमावर, अनुप नागापुरे उपस्थित होते विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा खूप आनंद झाला.

Post a Comment

0 Comments