Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नवभारत विद्यालयात पाककला स्पर्धा संपन्न, विद्यार्थ्यांनी बनविले विविध पदार्थ

नवभारत विद्यालयात पाककला स्पर्धा संपन्न, विद्यार्थ्यांनी बनविले विविध पदार्थ

मूल प्रतिनिधी

मूल शहरातील शालेय शिक्षणासोबतच विविध उपक्रम राबविणारी शाळा म्हणजेच नवभारत विद्यालय. या शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांकरीता पाककला स्पर्धा आयोजित केली होती. या पाककला स्पर्धेत महाराष्ट्र व उडीसा या राज्याचा आवडता पदार्थ बनवून आणायचा विषय ठेवण्यात आला होता.

यावेळी शाळेतील विद्यार्थी पियुश वाडनकरने झुनका भाकर सोबत कांदा आणला. नंदिनी वालदेनी पुरी भाजी, दिशा मोहुर्लेनी पाणी पुरी, दिपाली फाले हिने दोसा चटणी, तन्मय मेश्राम या विद्यार्थ्याने समोसा आदी पदार्थ तयार करून विद्यार्थ्यांनी आणले. विद्यार्थ्यांनी सुंदर सजावट करुन पदार्थ साजविले होते. विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या पदार्थांचा उपस्थित शिक्षकांनी चव घेऊन आनंद व्यक्त केला.

या पाककलेच्या स्पर्धेला शाळेचे मुख्याध्यापक श्री.झाडे अध्यक्षस्थानी होते, प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती राजमलवार आणि जेष्ठ शिक्षिका सौ.बांडगे मॅडम यांनी भुषविले. तसेच स्पर्धेला सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली.

Post a Comment

0 Comments