Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

मूल प्रतिनिधी

शेतात कामानिमित्त गेलेला शेतकऱ्याला विजेचा धक्का बसून तो जागीच ठार झाल्याची घटना कुरमार चांदलीच्या  शेतशिवारात रात्रौ दहा वाजताचे दरम्यान घडली. प्रमोद वसंतराव चटारे वय 40 राहणार मूल असे शेतकऱ्याचे नाव आहे.

मूल येथिल माऊली इलेक्ट्रिक संचालक तथा युवा शेतकरी प्रमोद वसंतराव चटारे हे गुरुवारी रात्र शेतावर गेले असता त्या ठिकाणी त्याला विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सोबत असलेल्या एका व्यक्तीने सदर घटना चांदली येथे येऊन काही नागरिकांना सांगितले. नागरिकांनी त्याला वीज प्रवाहापासून दूर करीत वीज वितरण कंपनीला माहिती दिली.
उत्तरे तपासणी करिता सावली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments