Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

गुरुजीचे फोटो लागणार शाळेतल्या वर्गात

गुरुजीचे फोटो लागणार शाळेतल्या वर्गात



होय मी गुरुजी

होय मी गुरुजी
माझे फोटो लागणार शाळेतल्या वर्गात
जसे गांधीचे लागतात
जसे आंबेडकराचे लागतात
साने गुरुजीचेही लागतात
तसेच माझे फोटो आता शाळेच्या भिंतीवर लटकणार आहे...
होय *जिवंतपणीच* लागणार आहेत..
तसा शासनाने जीआरच काढला आहे...
*गुरुजीचे फोटो वर्गात लावा* म्हणून..
माहित नाही कोणी केली पण
मंत्र्याकडे माझी तक्रार गेली
गुरुजी फक्त पगार घेतात...
आम्हाला शिकवायला दुसरेच पगारी पोर ठेवतात..
या तक्रारीची विधानसभेत चर्चा झाली...
तक्रार शिक्षण मंत्र्यांनी मान्य केली...
आणि निर्णय घेतला
पोरांना त्यांचा मास्तर कोण? हे माहीत झालं पाहिजे..
त्याचा फोटो वर्गाच्या भिंतीवर लागला पाहिजे...
म्हणजे शिकवणारा मास्तर, आणि पगार घेणारा मास्तर एकच आहे, आपल्या पुढचा मास्तर ' *ओरिजिनल* ' आहे..
हा ' *प्रूफ* ' पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या पोरांना मिळाला पाहिजे यासाठीच हा खटाटोप...
म्हणजे, *जखम पायाला आणि पट्टी डोक्याला* ! असेच नाही काय?
पगार घेणारा आणि वर्गात न शिकवणारा ओरिजनल मास्तर, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, गावचे पदाधिकारी, शिक्षण समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद चे सदस्य आपल्या ओरिजनल गुरुजीला ओळखू शकणार नाही? पगार घेणारे मास्तर, दोन-पाच हजारावर काम करून घेणाऱ्या पोरांचे फोटो भिंतीवर लावले तर पोरांना काय कळणार? ओरिजनल मास्तर कोणता???
मास्तरांचे फोटो भिंतीवर लावण्याऐवजी...
पोलिसात अट्टल चोरांचे फोटो हातात पाटी घेऊन लावतात तसे... निगराणी xxxx म्हणून लावले तर?
आणि हो,
मास्तराप्रमाणेच, सर्व सरकारी कार्यालयात पगार घेणारे वेगळे आणि काम करणारे वेगळेच असतात..
ज्याला सोप्या भाषेत आपण दलाल म्हणतो...
आरटीओत दलाल... पटवार्‍याचा कोतवाल.. कुणाकुणाचे? आणि कुठे कुठे फोटो लावणार?
 *आभाळच फाटले आहे ठिगळ कुठं लावणार?* 
आम्हीही तसेच आहोत, पोरं ठेवून शिकवणाऱ्या अशा दोन-चार मास्तरांना समज देण्याऐवजी आमची संघटना, त्यांचीच तळी उचलून धरणार..
शासन निर्णयाचे अंमलबजावणीसाठी शासनाने आमच्या फोटोचे पैसे द्यावे यासाठी लढा उभारणार...
जी आर संदिग्ध आहे, कोणत्या साईजचा फोटो लावायचा याचा उल्लेख नाही... फ्रेम केलेला लावायचा का डिजिटल बॅनर लावायचा याचा उल्लेख नाही... अशा फालतू चर्चावर आमच्या संघटना शासनाला सडो कि पळो करून सोडतील... आमची बदली झाली तर फोटो तिथेच ठेवायचा की सोबत घेऊन जायचा? याचीही स्पष्टता मागतील...
आहे ना गंमत??
तूर्तास, शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी म्हणून, माझा फोटो, वर्गातल्या भिंतीला टागंणार हे निश्चित!

विजय सिद्धावार
'गुरुजी'

Post a Comment

0 Comments