Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वाघाच्या हल्ल्यात युवक जखमी, चितेगाव येथील घटना

वाघाच्या हल्ल्यात युवक जखमी, चितेगाव येथील घटना

मूल प्रतिनिधी

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक सावली राजुरी उपक्षेत्रातील चितेगाव बिटातील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी चार वाजता चे दरम्यान घडली.

रवींद्र श्रीरंग गोहने वय 45 राहणार चितेगाव असे या जखमी इसमाचे नाव आहे. रवींद्र हा स्वतःच्या मालकीचे जनावरे चितेगाव येथील शेतशिवारात चरायला नेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करुन गंभीर जखमी केले.

घटनेची माहिती होताच जखमीला गावातील लोकांनी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments