Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ, मूल येथे आनंदाचे वातावरण

सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ, मूल येथे आनंदाचे वातावरण

मूल प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे ज्‍येष्‍ठ नेते, राज्‍याचे माजी अर्थमंत्री तसेच चंद्रपूर जिल्‍हयाचे माजी पालकमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी आज कॅबिनेट मंत्री म्‍हणून शपथ घेतली. राजभवन मुंबई येथे पार पडलेल्‍या शपथविधी सोहळयात सुधीर मुनगंटीवार यांना राज्‍यपाल भगतसिंह कोशारी यांनी मंत्री पदाची शपथ दिली.

शपथविधी सुरु असतानाच मुल येथील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवीत आणि फटाके फोडून मोठा जल्लोष साजरा केला.

सुधीर मुनगंटीवार यांना पुन्‍हा कॅबिनेट मंत्री पदी नियुक्‍ती देण्‍यात आल्‍याने प्रामुख्‍याने चंद्रपूर जिल्‍हयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन, विकासाचा झंझावात पुन्‍हा एकदा सुरु होणार असल्‍याची आनंददायी चर्चा नागरिकांमध्‍ये आहे.

Post a Comment

0 Comments