Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल शहरात ताजुद्दीन बाबा जयंती उत्साहात संपन्न

मूल शहरात ताजुद्दीन बाबा जयंती उत्साहात संपन्न

मूल प्रतिनिधी

मूल येथे सर्वधर्मीय समभावनानेचा संदेश देनारे संत बाबा ताजुद्दीन यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मूल शहरातील संपूर्ण मुस्लिम बांधव तसेच सर्वधर्मिय बांधवांनी एकत्र येऊन ताजुद्दीन बाबा यांची जयंती साजरी केली. मूल शहरात विविध मार्गातून मिरवणूक काढण्यात  आली.  यावेळी समाज बांधवानी फटाके फोडत गाण्यावर आणि संदलवर नाचत गाजत जयंती साजरी केली.

मूल शहरातील  गांधी चौकाचे बाजुला मंडपात बाबांची प्रतिमा लावण्यात येते.  तसेच समारोपाचे दिवशी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ताजुद्दीन बाबांच्या उर्स निमित्य नागपुर ताजबाग ला मूल शहरातील नागरिकांसाठी सुख शांती आणि समृद्धी लाभो या भावनेने बाबांच्या दर्ग्यावर चादर चढविण्यात येते. अशी माहिती तोसिफ सय्यद यांनी दिली.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी फिरोज पठाण, अरबाज पठाण, अन्वर शेख, सलीम कुरेशी, मोहसीन खान, समीर शेख, बाबू अली सय्यद, फिरोज खान, आदी मुस्लिम समाज बांधवांनी मेहनत घेतली. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता मूल पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.

Post a Comment

0 Comments