Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जागतिक छायाचित्र दिनानिमित्य जिल्ह्यातील छायाचित्रकारांचा सत्कार

जागतिक छायाचित्र दिनानिमित्य जिल्ह्यातील छायाचित्रकारांचा सत्कार

मूल प्रतिनिधी


छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनाचे 19 ऑगस्ट 2022 ला शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृह चंद्रपूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, प्रमुख पाहुणे आमदार किशोर जोरगेवार तर अध्यक्षस्थानी छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष नितीन रायपुरे, फुलचंद मेश्राम, राजू जोशी, विकास गोठे, सुनील व्ही. जे, मनोज टहलियानी, अनिल टहलियानी, अभय किरक्टे मंचावर उपस्थित होते.

छायाचित्राचे जनक लुईस डगोरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाला सरुवात करण्यात आली. जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील छायाचित्रकार एकत्रित येत सकाळी जटपुरा गेट ते गिरणार चौक - गांधी चौक मार्गे जटपुरा गेट अशी कॅमेरा दिंडी काढण्यात आली. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात जिल्ह्यातील ज्येष्ठ छायाचित्रकार, इयत्ता दहावी तथा बारावी 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या छायाचित्रकाराच्या अपत्यांच्या तसेच नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुनील व्हि. जे. तसेच सचिन पांढरे यांचे फोटोग्राफी व्यवसायाबद्दल उपस्थित छायाचित्रकारांना मार्गदर्शन केले.

यावेळी पोस्ट ऑफिसचे वतीने लावण्यात आलेल्या ३९९ रुपयाचा अपघाती विमा शिबिराचा जिल्ह्यातील ७० छायाचित्रकारांनी लाभ घेतला. जिल्ह्यातील ज्येष्ठ छायाचित्रकार प्रकाश मोगरे चंद्रपूर, तेजराज जानबा भगत चंद्रपूर, ज्ञानेश्वर मुखर्जी डांगे नागभीड, यशवंत कडूजी बांबोडे सावली, पुंडलिक दादाजी गुरनुले चिमूर, सुशांत दिगंबर वाकडे मुल यांचा तर गुणवंत विद्यार्थी संकेत राजेश कार्लेकर चंद्रपूर, संस्कृती विनोद झोडे भद्रावती, हर्षदा सतीश दिवाणजी चंद्रपूर, सिद्धांत ज्ञानेश्वर डांगे नागभीड, कैलास संजय बांबोडे नागभीड, वरेश विकास गोठे चंद्रपूर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता गोलू बाराहाते, नंदू सोनारकर, विशाल वाटेकर, टिंकू खाडे, विपिन मेंढे,  प्रीतम खोब्रागडे, देवा बुरडकर, अमोल मेश्राम, साजन रायपुरे, योगेश हूड, योगेश धकाते, नरेश वनकर, पवन प्रसाद, सुमित वैरागडे, प्रदीप शर्मा, जितेंद्र शेंडे, स्वप्निल तावाडे, अनिकेत बुग्गावार तसेच छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरचे सभासद व पोस्ट ऑफिस चंद्रपूरचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे संचालन अश्विनी खोब्रागडे तर कार्यक्रमाचे आभार सुशांत वाकडे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील छायाचित्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments