Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूलच्या तहसीलदाराची तत्परता, दोन दिवसात दिला मृतकाच्या कुटुंबीयांना मदतीचा चेक


मूलच्या तहसीलदाराची तत्परता, दोन दिवसात दिला मृतकाच्या कुटुंबीयांना मदतीचा चेक

मूल प्रतिनिधी

सरकारी काम आणि चार महिने थांब ही मराठीतील प्रचलित म्हण मोडीत काढत मूलचे तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांनी पुढाकार घेतला आणि विज पडून मृत पावलेल्याच्या कुटुंबीयास दोन दिवसात चार लाखाचा धनादेश घरपोच दिल्याने, कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू पाहायला मिळाले. 29 जुलै ला मूल तालुक्यातील दहेगाव येथील रहिवासी विलास रामुजी आलाम वय वर्षे 42 आपल्या शेतात काम करीत असताना अचानक पाऊस आणि विजांचा कडकडाट झाला. यावेळी वीज पडून विलास आलाम याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि आई वडील असा आप्तपरिवार आहे. 

घरचा कर्ता पुरुष गेल्याने शासनाकडे या कुटुंबीयांनी मदतीची मागणी केली या मागणीची दखल घेत तहसीलदार होळी यांनी तात्काळ कार्यवाही करत चार लाखाचा धनादेश मृतक विलास आलम यांच्या वारसांकडे सुपूर्द केला. 

धनादेश देताना नायब तहसिलदार यशवंत पवार, ओमकार ठाकरे, तलाठी अश्विनी फाले, दहेगावचे पोलीस पाटील, मृतकाचे कुटुंबीय उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments