Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नांदगाव येथे रानडुकराच्या हल्ल्यात दोन जण जखमी

नांदगाव येथे रानडुकराच्या हल्ल्यात दोन जण जखमी

मूल प्रतिनिधी

मुल तालुक्यातील नांदगाव येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजताची सुमारास भात शेतामध्ये पाहणी करण्यास गेलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांना रानडुकराने हल्ला करून जखमी केले आहे. धोंडूजी पत्रुजी वाघमारे राहणार चंद्रपूर वय 62 वर्ष व नीलकंठ मारुती नरसपुरे वय ६० वर्ष असे जखमी झालेल्या ज्येष्ठ शेतकऱ्यांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार धोंडूजी पत्र जी वाघमारे हे नांदगाव येथील नीलकंठ नरसपुरे यांची शेती करतात. शेत पाहण्यासाठी वाघमारे हे चंद्रपूर वरून नांदगावला आले, व नीलकंठ नरसपुरे यांच्या मालकीची शेती दोघात असल्यामुळे दोघेही मिळून शेतीकडे पाहायला गेले होते. सायंकाळच्या सुमारास घरी परत येण्याच्या तयारीत असताना अचानक रानडुकराने त्यांचे वर हल्ला करून दोघांनाही जखमी केले. दोघांच्याही मांडीला पायाला गंभीर जखमा झाल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना बेंबाळ येथील प्राथमिक रुग्णालयात पाठवण्यात आले.

Post a Comment

0 Comments