Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वाढदिवसानिमित्त फळ व बिस्कीटचे वाटप

वाढदिवसानिमित्त फळ व बिस्कीटचे वाटप

मूल प्रतिनिधी

मूल शहरातील सामाजिक कार्यकर्ते, युवा नेतृत्व सचिन बोर्डावार यांच्या वाढदिवसानिमित्त मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.

शांत संयमी व सोज्वल स्वभावाची सचिन बोर्डावार यांची ओळख आहे. सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असतात. ज्या परिसरात ते वास्तव्य करतात त्यांच्या शेजारी कुठलाही मदतीचा प्रसंगाकरिता लगेच धावून जाण्याचे कार्य त्यांच्या हातून होत असते. सचिनच्या वाढदिवसानिमित्त मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी श्री साई मित्रपरिवार चे विवेक मुत्यलवार, संदिप आलेवार, डॉ. वैभव कोमलवार आदी सदस्य, मित्र परिवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments