Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नायलॉन मांजाने झाडावर अडकलेल्या घुबडाची सुटका

नायलॉन मांजाने झाडावर अडकलेल्या घुबडाची सुटका

मूल प्रतिनिधी

मूल येथील रेस्ट हाऊस समोर चर्च च्या आवारात असलेल्या कडुनिंबाच्या झाडावर पंख अडकलेल्या स्थीतीथ एक घूबड अडकून असल्याची माहिती स्थानिक रहिवाशी राहूल कोंतमवार यांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना दीली. माहिती मिळताच संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे, दिनेश खेवले, अक्षय दुम्मावार, प्रनीत पाल , विशाल टेकाम हे घटनास्थळी पोहोचले. त्या झाडाची पहानी करतांना असे आढळून आले की एक गव्हानी घूबड नायलॉन मांजा मधे पंख अडकलेल्या स्थीतीथ लटकत होते. वीशाल टेकाम याने झाडावर चढून नायलॉन मांजा तोडला व घुबडाला खाली सोडले.
 
संस्थेच्या सदस्यांनी अलगद त्या घूबडाला खाली उतरवले. घुबडाच्या पंखात गूरफटलेल्या मांजाला कैचीने कापुन घूबडाची सुटका केली व प्रथमोपचार करून त्याला सुरक्षित पणे पींज-यात ठेवण्यात आले. घुबड हा पक्षी नीशाचर असल्यामुळे त्याला रात्री वनरक्षक मरस्कोले व क्षेत्रसहाय्यक श्री मस्के यांच्या उपस्थितीत सोडन्यात येईल. नायलॉन मांजावर बंदी असतांनाही पतंग उडवीतांना सर्रास पणे नायलॉन मांजाचा वापर केला जातो. त्यामुळे अनेक पक्षी मांजा मधे अडकुन मृत्यु पावतात. शेकडो पक्षी जखमी होतात. यावर संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments