Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बल्लारपूर पब्लिक स्कूल, मुल येथे स्वातंत्र्यदिन संपन्न

बल्लारपूर पब्लिक स्कूल, मुल येथे स्वातंत्र्यदिन संपन्न 

मूल प्रतिनिधी

आज दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी सोमवार ला बल्लारपूर पब्लिक स्कूल, मुल येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजी मुख्याध्यापिका नवभारत कन्या विद्यालय, मुल सौ. वैरागडे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. तसेच मुख्यअतिथी म्हणून सौ. वाळके मॅडम प्राचार्य कर्मवीर महाविद्यालय मुल, विशेष अतिथी म्हणून श्री. अशोक झाडे सर प्राचार्य नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मुल, हे होते.
 श्री. खांडरे सर गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती मुल, सौ. गुज्जनवार मॅडम विस्तार अधिकारी, सौ. पिंपळे मॅडम विस्तार अधिकारी, श्री गायकवाड सर प्राध्यापक कर्मवीर महाविद्यालय मुल, श्री. कटकमवार सर अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती बल्लारपूर पब्लिक स्कूल, मुल  तसेच श्री. सुपनेर सर,  पालक, व प्राचार्य श्री विनोद सर बल्लारपूर पब्लिक स्कूल, मुल हे अतिथी म्हणुन कार्यक्रमात उपस्थित होते.
प्राचार्य विनोद सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तोषी जयस्वाल शिक्षिका तसेच कु. उत्कर्षा वाळके वर्ग ९ वा व कू. गितेश गावतूरे यांनी केले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वेगवेगळे नृत्य स्पर्धा व भाषणे दिली. विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्याकरिता विद्यार्थी व शिक्षक वृंदानी पारितोषिक देण्यात आली.
 
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्राचार्य, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिक्षम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्ग १० वी चा विद्यार्थी पुरब पिल्लारवार यानी केले. व कार्यक्रमाची सांगत वंदे मातरम् या राष्ट्रगान झाली.

Post a Comment

0 Comments