Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सजल्या शासकीय इमारती.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सजल्या शासकीय इमारती.

मूल प्रतिनिधी


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्ताने देशभर विविध कार्यक्रम सुरू आहे. नागरिकासह शासन पातळीवरही हा अभियान उत्साहपूर्वक वातावरणात पार पाडल्या जात आहे. स्वातंत्र्याचा महोत्सव सणासारखा साजरा करीत याला उत्सवाचे स्वरूप मूल येथील कल्पक अधिकाऱ्यांनी दिले आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असतानाच या प्रशासकीय इमारतीलाही तिरंगी विद्युत रोषणाई करीत नागरिकांचे पारणे फेडत आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, मूल पंचायत समिती मुल, नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभाग या इमारतीवर तिरंगी विद्युत रोषणाई केल्याने देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Post a Comment

0 Comments