Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नवभारत विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ स्थापन, निवडणुकीबाबत विद्यार्थ्यांना दिली सखोल माहिती

नवभारत विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ स्थापन, निवडणुकीबाबत विद्यार्थ्यांना दिली सखोल माहिती

मूल प्रतिनिधी

नवभारत विद्यालय मुल येथे लोकशाहीच्या माध्यमातून शालेय मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. निवडणूक म्हणजे काय? मोठी माणसे मतदान कसे करतात? ईव्हीएम मशीन कशी असते? मतमोजणी कशी करतात? शाई का लावतात? आणि एकूण प्रक्रिया कशी असते? असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात. त्यावेळी शाळेतील  शिक्षक  यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय सहकारी शिक्षकांना बोलून दाखवला आणि ही प्रक्रिया राबविली.

पाचवी ते दहावी पर्यंतसाठी प्रत्येक वर्गासाठीची विविध पदे सांगून वर्गस्तरची निवडणूक  घेण्यात आली. यात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, शिक्षण, आरोग्य ,स्वच्छता, पर्यावरण , क्रीडा, अशी पदे निवडली गेली. सोबतच त्यांची कामे सांगून जबाबदारी देण्यात आली आणि शाळेचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व इतर  पदासाठी निवडणूक घ्यायची तयारी केली. या पदासाठी  विद्यार्थी उमेदवार इच्छुक होते. त्यांना एक दिवस प्रचार करण्यासाठी वेळ दिला. मतदान प्रक्रिया मतपत्रिकेद्वारे पार पडली.
           
                                     
आज दि.12/08/2022 ला विद्यालयाच्या प्रांगणात रीतसर निकाल जाहीर करण्यात आला. शालेय मंत्रिमंडळ निवडणूक 2022 करीता मुख्यमंत्री म्हणून नागेश्वर कंकलवार,उपमुख्यमंत्री ओम लांजेवार, सांस्कृतिक मंत्री साक्षी मेश्राम, आरोग्य मंत्री वेदांत कावळे, क्रीडा मंत्री घनश्याम भाकरे, पर्यावरण मंत्री दिपाली फाले, शिक्षण मंत्री शिव शेंडे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांनतर त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना कामे कशी करायची, शिक्षकांना मदत केव्हा करावी, शिस्त व स्वच्छता ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याध्यापक श्री.झाडे, श्रीमती राजमलवार पर्यवेक्षिका, जेष्ठ शिक्षक श्री. मुंडरे, गुरुदास चौधरी , श्री.डांगरे व इतर सहकारी शिक्षक,शिक्षिका यांनी केले. 

मतदान अधिकारी भारत सलाम, एस एन चौधरी, सौ. भांडारकर, व्ही. डी. मोडक, व्ही एन निखारे, टी जी निमसरकार, एस एन उरकुडे, आर व्हीं डांगरे, जी आर चौधरी, एन एस माथनकर , कु. पी. पी उमक , पी पी वाळके, आर बी बोढे, सी बी पुप्पलवार, डी एस गोंगल, एम एन तलांडे या शिक्षकांनी निवडणुक प्रक्रिया जबाबदारीने पार पाडली.

Post a Comment

0 Comments