Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शासनाचे ध्येयधोरण व उद्दिष्टानुसार महसूल प्रशासन काम करीत राहील - तहसिलदार रवींद्र होळी

शासनाचे ध्येयधोरण व उद्दिष्टानुसार महसूल प्रशासन काम करीत राहील - तहसिलदार रवींद्र होळी

मूल प्रतिनिधी

शासनाचे जे काही उद्दिष्ट व ध्येयधोरण आहेत त्या अनुषंगाने तालुका प्रशासन आणि महसूल प्रशासन नागरीकांचे काम करीत राहणार असल्याचे मत तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी महसूल दिनी व्यक्त केले.

1 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त मूल येथील तहसील कार्यालयात महसूल दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, प्रमुख अतिथी नायब तहसीलदार पृथ्वीराज साधनकर, यशवंत पवार, ओमकार ठाकरे, कुमरे आदी उपस्थित होते.


यावेळी नायब तहसीलदार ओमकार ठाकरे, मंडळ अधिकारी अनुप खोब्रागडे, तलाठी किरण मोडकवार, महेश कडवलवार, अव्वल कारकून दिनेश पुजारी, तुंकलवार, महसूल सहाय्यक श्रीमती वडगावकर, शिपाई माया संगीडवार, कोतवाल सुशांत खोब्रागडे आदी अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

सोबतच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेश वितरित करण्यात आले, महसुली आदेश, विविध प्रमाणपत्र, रेशनकार्ड, नागरिकांना वितरित केले.  कार्यक्रमाचे संचालन तलाठी अश्विनी फाले तर आभार प्रदर्शन पृथ्वीराज साधनकर यांनी मानले. कार्यक्रमाला तहसिल कार्यालयातील अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी, शेतकरी, नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments