Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

75 वा अमृत महोत्सव कार्यक्रम, मूलच्या रविना प्रभाकर धोटे हिची राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेकरीता करिता निवड.

75 वा अमृत महोत्सव कार्यक्रम, मूलच्या रविना प्रभाकर धोटे हिची राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेकरीता करिता निवड.

मूल प्रतिनिधी

75 वा अमृत महोत्सवानिमित्त देशात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात रांगोळी मेकिंग स्पर्धा 10 वर्षांवरील सर्व स्पर्धकांसाठी फरवरी महीन्यात ऑनलाइन स्वरूपात देशभरात आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा दिल्ली येथून घेण्यात आली होती.

ऑनलानद्वारे रांगोळी काढून स्पर्धेत सहभागी व्हायचे होते. या  स्पर्धेत तीन फेरीत निवड करण्यात येणार आहे. प्रथम  फेरीत मूल येथील रविना प्रभाकर धोटे ही  चंद्रपूर जिल्यातून प्रथम आली असून राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे. द्वितीय सोनाली बी.चहांदे तर तृतीय सुरभी किशोर जुनघरे ह्याचा क्रमांक आहे.

राज्यस्तरीय स्पर्धा झाल्यानंतर ही स्पर्धा शारीरिक पद्धतीने दिल्ली येथे होणार आहे. जिल्हयातील स्पर्धकांचे रांगोळी मेकिंग स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून यांना पुढल्या फेरीकरीता शुभेच्छा देण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments