Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

महाराष्ट्र कराटे असोसिएशन च्या 43 व्या कराटे स्पर्धेत मूल च्या श्रीजा ला सुवर्ण आणि विधीला कांस्य पदक

महाराष्ट्र कराटे असोसिएशन च्या 43 व्या कराटे स्पर्धेत मूल च्या  श्रीजा ला सुवर्ण आणि विधीला कांस्य पदक

मूल प्रतिनिधी

महाराष्ट्र ऑलिम्पिक अससोसिएशन ची मान्यता असलेल्या महाराष्ट्र कराटे अससोसिएशनची 43 वी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा-2022, ही  27 आणि 28 ऑगस्ट रोजी पुणे येथील बालेवाडी स्पोर्ट्स स्टेडियम मध्ये पार पडली. ह्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्याच्या खेळाडूंचा समावेश होता,सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या टीम मध्ये कराटे & फिटनेस क्लब मूलच्या खेळाडूंचाही समावेश होता. त्यात श्रीजा सूचित सहारे हिने वय 10 वर्ष खालील मुलींमध्ये काता प्रकार मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्ण पदक मिळविला तर वय 14 ते 16 वर्ष आतील मुलींमध्ये विधी संजय कोटकोंडावार हिने कुमिते प्रकार मध्ये कांस्य पदक मिळविला आहे.दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वरील दोन्ही खेळाडू क्लब चे संचालक-प्रशिक्षक इम्रान खान सर आणि निलेश गेडाम सर तसेच सह-प्रशिक्षक साहिल खान आणि अमान खान यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेतात तसेच खेळाडूंना सेन्सेई विनय बोढे सर यांचे आशीर्वाद लाभले आहे तर खेळाडूंनी ही आपल्या यशाचे पालक आणि प्रशिक्षकांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments