Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बेंबाळ ते बोंडाळा (भुज)शेतशिवारात जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा, ग्रामपंचायती चे दुर्लक्ष

बेंबाळ ते बोंडाळा (भुज)शेतशिवारात जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा, ग्रामपंचायती चे दुर्लक्ष

मूल प्रतिनिधी


मूल तालुक्यातील बेंबाळ ग्रामपंचायत अंतर्गत येणारा बेंबाळ ते बोडाळा(भुज) शेतशिवाराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुर्दशा कायम असून नागरिकांना व गावातील बैलबंडी आणि गुरांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. मागील आमसभेत रीतसर अर्ज देऊन सुद्धा सरपंच व सचिव या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. मागील दहा ते पंधरा दिवसापासून चालू असलेल्या संतधर पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून अनेक शेतकऱ्यांना या रस्त्याने जाताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.  सदर रस्त्याची मागणी करून सुद्धा ग्रापंचायत  याकडे दुर्लक्ष करीत आहे.

निवडणुकीच्या काळात फक्त आश्वासने दिली जातात मात्र प्रत्यक्षात गावातील समस्याकडे लक्ष दिले जात नाही. अशी खंत गावातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्याकडे प्रचंड दुर्लक्ष केल्याचा आरोप बेंबाळ येथील युवा शेतकरी नवीन ध्यानबोईवार l सह बेंबाळ येथील शेतकऱ्यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments