Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

दडपशाही करणाऱ्या मोदी सरकारचा मूल तालुका काँग्रेस कडून केला निषेध

दडपशाही करणाऱ्या मोदी सरकारचा मूल तालुका काँग्रेस कडून केला निषेध

मूल प्रतिनिधी
 

केंद्रातील भाजपचे मोदी सरकार राजकीय सुडबुध्दीने काॅंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांना लक्ष करीत असल्याचे आज संपूर्ण देश पाहत आहे. भाजप सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व धोरण यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी काॅंग्रेस नेत्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. हे हुकुमशाही शासन केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहे.



या हुकुमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी मूल तालुका  काॅंग्रेसच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसचे जेष्ठ नेते संतोषभाऊ रावत अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक यांचे नेतृत्वात  शांततापूर्ण सत्याग्रहाचे आयोजन २६ जूलै मंगळवारला मूल शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ  गांधी चौक, मूल येथे करण्यात आले होते.


यावेळी घनश्यामजी येनुरकर अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी, मूल, सुनिल  शेरकी अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी मूल, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मूल तालुका अध्यक्ष राकेश रत्नावार, रुपालीताई संतोषवार अध्यक्षा, तालुका महिला काॅंग्रेस कमेटी मूल, रत्नाताई चौधरी अध्यक्षा,शहर महीला काँग्रेस कमिटी मूल, पवन निलमवार अध्यक्ष, तालुका युवक काँग्रेस कमिटी मूल, व्यंकटेश पुल्लकवार अध्यक्ष, शहर युवक काँग्रेस कमिटी मूल, माजी नगरसेविका लीना फुलझेले, माजी नगरसेवक विनोद कामडे, किशोर घडसे, संदीप मोहबे, विवेक मुत्यलवार,अतुल गोवर्धन, सुजित खोब्रागडे, गणेश रणदिवे  आणि तालुक्यातील काॅंग्रेसचे सर्व पदाधिकारी,  काॅंग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे कार्यकर्ते यांनी सदर आंदोलनात सहभागी होते.

Post a Comment

0 Comments