Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

धनंजय पोटे यांची "बेवारस" कादंबरी लवकरच वाचकांच्या सेवेत - अरुण झगडकर

धनंजय पोटे यांची "बेवारस" कादंबरी लवकरच वाचकांच्या सेवेत - अरुण झगडकर

मूल प्रतिनिधी


प्रत्येक व्यक्तीमध्ये निसर्गतः अवलोकन करण्याची शक्ती असते.अभिरुची,आवड,अभिवृत्ती,तत्परता यामधून आंतरिक प्रेरणा मिळते असते. अशातच समाजाला दिशा देणारी नवीन साहित्यकृती निर्माण होते.अशीच नवप्रेरणा घेऊन प्रत्यक्ष अनुभलेले आणि आत्मबोधातून उलगडलेल्या जाणीवांना शब्दबध्द करीत कादंबरीकार धनंजय पोटे यांची बेवारस ही पहिली कादंबरी प्रकाशित होत आहे. या कादंबरीत ग्रामीण भागातील व्यक्ती, वृत्तीचे आणि स्वभावाचे वस्तुनिष्ठ अवलोकन आहे. 

शेत शिवारात बेवारस स्थितीत पडलेल्या अनाथ बालकाला कवेत घेऊन मायेची ऊब देणारी एक वृद्ध आजी मातृत्वाची झालर गणेशच्या आयुष्याला आधार ठरते. पण समाजातील दृष्ट मानवांच्या परिक्रमामध्ये गणेश हतबल होतो. गावातील उपद्रवी माणसांच्या उपद्व्यापाचा सामना करीत असताना कुटुंब कलहाने अस्वस्थ झालेला अवघ्या सात वर्षाचा गणेश आधाराची काठी मोडल्या गत आजीपासून पोरका होतो आणि अचानक त्या दुष्ट माणसाच्या तावडीत सापडतो.
अशाच एका वळणावर असताना गणेशच्या जीवनात माणुसकी जपणारा एक चायवाला काका मिळतो आणि त्याच्या आधाराने गणेशच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळते. मातृत्व, नेतृत्व आणि नेतृत्वाला मुकलेला गणेश जीवनाच्या एका टप्प्यावर ते प्राप्त करतो.

बेवारस या कादंबरी मधून कादंबरीकार धनंजय पोटे यांनी भारतीय समाजव्यवस्थेतील मानवी वृत्ती, प्रवृत्ती, संस्कृती आणि समाज विघातक दुष्ट लोकांचे जिवंत चित्र निर्माण केलेले आहेत. समाजातील दृष्ट मानवी वृत्तीच्या विविध भावछटा  बेवारस या कादंबरीत आलेल्या आहेत. धनंजय पोटे यांच्या लेखणीतून साकार झालेली बेवारस ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल याची मी ग्वाही देतो.


            अरूण झगडकर
            भूभरी कार,चंद्रपूर

Post a Comment

0 Comments