Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कालव्याची पाळ फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान - मोती टहलियानी


कालव्याची पाळ फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान - मोती टहलियानी

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील मारोडा मार्गावरील कोसंबी पर्यंत 22 किलोमीटर लांबीच्या सदर कालव्याची पाळ फुटल्याने शेतात पाणी जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या सतत दार अतिवृष्टीमुळे सोमनाथ डोंगर परिसरातील पावसाचे पाणी लगतचे शेत आणि कालवा तुडुंब भरले, त्यामुळे सोमनाथ पासून काही दूर अंतरावर शेताला लागून असलेल्या कालव्याची मोठी पाळ फुटली. त्यामुळे कालव्यातील पावसाचे पाणी शेतात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

कालवा फुटलेल्या ठिकाणी 50 ते 60 फूट लांब पाळ फुटलेली असून मोठ्या प्रमाणात पाणी शेतात जात आहे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सिंचन विभागाने तातडीने दुरुस्ती करावी यासंबंधी आ. सुधीर मुनगंटीवार  यांना माहिती दिली असून त्यांनी दखल घेतली आहे अशी माहिती मोतीलाल टहलीयानी यांनी मूल Live शी बोलताना दिली.

Post a Comment

0 Comments