Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जिल्हा परिषदे च्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरुनुले यांच्या गाडीचा अपघात

जिल्हा परिषदे च्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरुनुले यांच्या गाडीचा अपघात

मूल प्रतिनिधी

जिल्हा परिषद चंद्रपूरच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना काल दि. 7 ला गुरुवारी सायंकाळी 4 वाजताचे दरम्यान नंदोरी नाक्यावर घडली. सुदैवाने कुणालाही इजा झाली नसून मोठा अपघात टळला आहे.

संध्याताई गुरूनुले ह्या नागपूर वरून आपले काम आटोपून चंद्रपूरला पक्षाच्या बैठकीला जात असताना नंदोरी नाक्यावर गाडी हळू केली असता मागच्या बाजूने येणारी एम एच 34  बी एफ 4026 या नंबर च्या एका कारने जोरात धडक दिली. धडक जोरात होती मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. संध्याताई यांचे गाडीत त्यांचा मुलगा फिस्कुटी चे सरपंच नितीन गुरनुले हे सोबत होते. 

विशेष म्हणजे ज्या कार ने संध्याताई यांच्या गाडीला धडक दिली, त्या कारच्या मागे माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची गाडी होती. अशी माहिती संध्याताई गुरूनुले मूल Live शी बोलताना दिली.

Post a Comment

0 Comments