Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

माऊंट कॉन्व्हेंट येथे क्रीडा स्पर्धा,वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

माऊंट कॉन्व्हेंट येथे क्रीडा स्पर्धा,वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

मूल प्रतिनिधी
 

माऊंट कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मुल येथे वृक्षारोपण आणि क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक रवी कावळे तर प्रमुख अतिथी म्हणून अश्यपाक सय्यद, अकॅडमीक प्रमुख आणि दुशान्त सर ज्युनिअर कॉलेज प्रमुख उपस्थित होते. शाडेचे मुख्याध्यापक रवि कावळे यानी आपल्या भाषनातून विद्यार्थ्याना खेळाचे महत्व, खेळाचे नियम, विद्यार्थी जीवनात खेळाला अनन्य महत्व व  खेळाशी निगडित सर्व नियम,शारीरिक शुद्धता इत्यादी मुद्द्यावर मार्गदर्शन केले.
अतिथीने आपल्या भाषणातून पर्यावरण संरक्षण करणे काळाची गरज आहे, तर खेळा मधून शरीराचं संपूर्ण व्यक्तिमत्वाचे विकास होते हे पटवून दिले. यावेळी शाळेच्या मैदानात वृक्षारोपण आणि विविध खेळ खेळण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुपेंद्र सर तर आभार प्रदर्शन अश्यपाक सय्यद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांनी परिश्रम घेतला.

Post a Comment

0 Comments