Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे कारगिल विजय दिवस कार्यक्रम संपन्न

मूल येथे कारगिल विजय दिवस कार्यक्रम संपन्न

मूल प्रतिनिधी

माजी सैनिक संघटना मूल तथा भरारी माजी सैनिकी महिला बचत गट मूल यांच्या संयुक्त विद्यमाने अमर वीरांच्या सन्मानार्थ २६ जुलै कारगिल विजय दिवस निमित्ताने शहीद स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन मूल येथील आदिवासी मुलांचे वस्तीगृह च्या सभागृहात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, उद्घाटक मूलचे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, प्रमुख उपस्थिती माजी सैनिक कल्याण बौद्धेशीय संस्थेचे अध्यक्ष हरीश गाडे, चंद्रपूर येथील पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोबाटे, श्री साई मित्रपरिवार चे अध्यक्ष विवेक मुत्यलवार, शिवशाही मित्रपरिवार मूलचे अध्यक्ष पंकज कोहळे, मुल तालुका छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष रुपेश कोठारे, माजी सैनिक तथा ज्येष्ठ नागरिक मारुती कुळमेथे आदी पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन आणि आभार प्रदर्शन माजी सैनिक सहदेव रामटेके यांनी केले. कार्यक्रमाला मूल येथील माजी सैनिक आणि माजी सैनिकी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments