Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ओबीसीनो, मंडल यात्रेत सहभागी व्हा, नियोजन सभेत करण्यात आले आव्हाहन

ओबीसीनो, मंडल यात्रेत सहभागी व्हा, नियोजन सभेत करण्यात आले आव्हाहन 

मूल प्रतिनिधी

ओबीसी जनगणना समन्वय समिती, व ओबीसी विविध संघटनेची मुल मंडल यात्रा नियोजन सभा मूल येथे  आयोजित करण्यात आली होती.४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मंडल यात्रा मुल येथे पोहोचणार असून यात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहाने करण्याचे बैठकीमध्ये ठरविण्यात आले. यासाठी ओबीसी युवकांनी, महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच मुल नगरातून ओबीसींची महाऱ्याली काढून जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी संघटित होऊन मंडल यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीला मार्गदर्शक म्हणून प्रा. अनिल डहाके, डॉ. समीर कदम, मुख्यसंयोजक डॉ. राकेश गावतुरे, प्राचार्य कऱ्हाडे, प्रा.ताजने, प्रा. वासाडे, प्रा.धोटे, लक्ष्मण खोब्रागडे यांची उपस्थिती होती. यात्रेचे स्वागत रॅलीचे नियोजन व पुढील स्वरूप कसे असावे याबाबत गुरु गुरनुले, संजय पडोळे,जितेंद्र लेनगुरे,लक्ष्मण खोब्रागडे यांनी आपले विचार व्यक्त केले. सभेचे संचालन व आभार मुल संयोजक प्रा.विजय लोनबले यांनी केले. आयोजित तातडीच्या सभेला गंगाधर कुंघाटकर, सुनील शेरकी, हसन वाढई, देवराव ढवस, मंगर सर,जितेंद्र बल्की, युवराज चावरे, ईश्‍वर लोनबले,राकेश मोहरले, रामदास गुरनुले,कैलास चलाख, ओमदेव मोहरले, महाडोळे, अमित राऊत, प्रशांत भरतकर यांचेसह अनेक ओबीसी चळवळीचे संघटक ,कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments