Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

साहित्य म्हणजे अंतर्मनात उमगलेले विचारप्रतिक प्रकट करणारा आरसा : अरुण झगडकर

साहित्य म्हणजे अंतर्मनात उमगलेले विचारप्रतिक प्रकट करणारा आरसा : अरुण झगडकर

मूल प्रतिनिधी

सावली तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा केरोडा येथील विषय शिक्षक कवी सुरेश गेडाम
यांच्या स्वलिखित "प्रतिबिंब" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पंचायत समिती सभागृह सावली येथे रविवार दि.२४ जूलै ला आयोजित करण्यात आले. सोबतच निमंत्रितांचे कवी संम्मेलन संपन्न झाले.
झाडीबोली साहित्य मंडळ,चंद्रपूर द्वारा आयोजीत या कार्यक्रमाचे अध्यक्ष,ग्रामगीताचार्य बंढोपंत बोढेकर,केंद्रीय सदस्य झाडीबोली साहित्य मंडळ साकोली तर उद्घाटक म्हणून डॉ. चंद्रकांत लेनगुरे अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोली व प्रमुख अतिथी कवी अरुण झगडकर अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर यांनी साहित्यातून अंतर्मनातील भावविश्वाचा विचार प्रतीक आरश्याप्रमाणे प्रकट होत असल्याचे आपल्या निवेदनातून व्यक्त केले . प्रमुख भाष्यकार कवयित्री प्रीती जगझाप बल्लारपूर,रामकृष्ण चनकापुरे सरचिटणीस झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर आणि कवी संम्मेलनाचे अध्यक्षस्थानी डॉ. प्रविण किलनाके जेष्ठ कवी गडचिरोली,जेष्ठ कवयित्री शशिकला गावतूरे मूल,आदी मान्यवरांची उपस्थिती होती .प्रकाशन सोहळा तथा बहारदार कवी संमेलनात श्रीकांत धोटे , प्रशांत भंडारे , सुनील बावणे , सरिता गव्हारे , छाया टिकले , मनीषा मडावी , मंगला गोंगले , मालती शेमले , किरण चौधरी ,दुष्यंत निमकर , गणेश आसेकर , साक्षी राऊत , निधी चौधरी यांनी कविता सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन संतोष मेश्राम व संगिता बांबोळे यांनी केले तर आभार वृन्दा पगडपल्लीवार व लक्ष्मण खोब्रागडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments