पाण्याखाली आलेल्या शेतीची नुकसान भरपाईची दया, शेतकऱ्यांची मागणी
अंतरंगाव पारडवाही येथील शेतकऱ्यांचे शेत मागील 10 दिवसा पासून पाण्याखाली असून शेतकऱ्यांची खूप नुकसान झाली आहे. दुबार पेरणी होऊन सुद्धा पुन्हा पेरणी करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज मूल चे तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यांना निवेदन देण्यात आले. मोका चौकशी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगितले. यावेळी निवेदन देताना अंतरंगाव परडवाही येथील शेतकरी रामचंद्र बोबाटे, भाऊराव झाडे, विद्या बोबाटे, भावनाताई चौखुंडे, मंदाताई रोहनक, डोमाजी चौखुंडे, प्रशांत बोबाटे आदी शेतकरी बंधू उपस्थित होते.
0 Comments