Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बाजार समिती निवडणुकीत मिळणार शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मोती टहलीयानी यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती मागणी

बाजार समिती निवडणुकीत मिळणार शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

मोती टहलीयानी यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती मागणी

मूल प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक येत आता शेतकऱ्यांनाही मतदानाचा अधिकार मिळणार आहे मुल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोती टहलियाने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली होती या मागणीची दखल घेत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा थेट संबंध कृषी उत्पन्न बाजार समितीशी येतो, मात्र त्यांना मतदानाचा हक्क नाही. पणन कायदा 1963 नुसार राज्यात कायदा अस्तित्वात आला तेव्हापासून संबंधित कार्यक्षेत्रात होणारे ग्रामपंचायत सदस्य व सेवा सहकारी संस्थांचे सदस्य यांना मतदान करता येत होते, हा खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची बाब मोती टहलियानी यांनी 8 नोवेंबर 2014 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन लक्षात आणून दिली होती. ज्यांच्या नावाने सातबारा आहे अशा शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल, या नव्या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक शेतकऱ्यांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments