Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

आराध्य कारडेची नवोदय विद्यालयात निवड, शहरी भागातला एकमेव विद्यार्थी

आराध्य कारडेची नवोदय विद्यालयात निवड, शहरी भागातला एकमेव विद्यार्थी

मूल प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षेत सेन्ट एन्स पब्लिक स्कूल मुल चा चा विद्यार्थी आराध्य श्रीकांत कारडे हा उत्तीर्ण झालेला असून त्याची चंद्रपूर जिल्ह्यातील बाळापूर तळोधी येथील नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वर्गात प्रवेशा करीता निवड झालेली आहे.

ही परीक्षा 30 एप्रिल 2022ला घेण्यात आली व परीक्षेचा निकाल 8 जुलै 2022 ला घोषित  करण्यात आला. नवोदय विद्यालय प्रवेशा करिता चंद्रपूर जिल्ह्यात शहरी भागातून एकूण सात विद्यार्थ्यांची निवड झालेली असून त्यामध्ये आराध्य श्रीकांत कारडे हा मूल तालुक्यातील शहरी भागातला एकमेव विद्यार्थी आहे. आराध्यने या परीक्षेची तयारी मागील दोन वर्षापासून सुरू केलेली होती. कोणतीही खाजगी शिकवणी वर्ग न लावता आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी करून आराध्याने हे यश मिळवलेले आहे.

आराध्यचे वडील कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत असून आराध्यची नवोदय विद्यालय प्रवेशा करिता निवड झाल्याने कौतुकाचा वर्षाव होत आहे.आराध्यने आपल्या यशाचे श्रेय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व आई-वडील यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments