Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न, 96 उमेदवारांची प्राथमिक निवड

मूल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न, 96 उमेदवारांची प्राथमिक निवड

मूल प्रतिनिधी

जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि कर्मवीर महाविद्यालय मुल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन मुल येथील कर्मवीर महाविद्यालयात करण्यात आले होते. रोजगार मेळाव्यामध्ये अँलस्टी म्युच्युअल फंड निधी लिमिटेड, स्पंदन स्फूर्ती फायनान्स लिमिटेड, डी मार्ट, बजाज ऑटो लिमिटेड, आस्क फर्स्ट एचआर डेस्क, हेक्सावेअर कंपनी साथ आऊटसोसिंग कंपनी लिमिटेड, नवभारत फर्टीलायझर लिमिटेड या कंपन्यांनी सहभाग नोंदविला. मेळाव्यात जवळपास 165 उमेदवारांनी नोंदणी केली आणि संबंधित कंपनीकडे 351 पदासाठी प्राथमिक मुलाखती दिल्या.  वरील विविध कंपनीने 96 उमेदवारांची प्राथमिक निवड केली असून अंतिम निवड करिता संबंधित उमेदवारांना कंपनीमार्फत त्यांच्या मुख्यालयी बोलविण्यात येणार असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, प्रमुख अतिथी सक्सेस कॅम्पुटर एज्युकेशन मूलचे संचालक नितीन येरोजगार,चंद्रपूर जिल्हा कौशल्य विकास अधिकारी शैलेश भगत, प्रा. प्रवीण उपरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश भगत यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. गजानन आगलावे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. गजानन घुमडे यांनी केले

Post a Comment

0 Comments